South Africa Kagiso Rabada Breaks 119 Year Old Record Against Pakistan : दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज आपल्या भेदक माऱ्यानं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना दमवण्यासाठी ओळखला जातो. पण पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत पाकिस्तान गोलंदाजांना घाम फोडला. रावळपिंडीच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रबाडानं ११६.३९ च्या स्ट्राइक रेटसह धावा करताना त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक साजरे करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. दमदार अर्धशतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् रबाडानं मोडला ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम
रावळपिंडीच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं २३५ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. सेनुरन मुथुसामी याने केलेल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीशिवाय रबाडाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या. शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला करताना रबाडाने ६१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. या खेळीसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून ११ व्या क्रमांकावर खेळताना सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम रबाडाच्या नावे झाला आहे. याआधी १९०६ मध्ये बर्ट वोग्लर याने इंग्लंडविरुद्धच्या केपटाउन कसोटीत ६२ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड होता. ११९ वर्षांपूर्वीचा हा विक्रम रबाडाने मोडीत काढला.
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्याची संधी हुकली, पण...
कगिसो रबाडा पहिले अर्धशतक ठोकल्यावर या खेळीचं तो शतकी खेळीत रुपांतर करत तो नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करेल, असे वाटत होते. पण ७१ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. पण या खेळीतही त्याने इतिहास रचला. पाकिस्तान विरुद्धच्या ११ व्या क्रमांकावर खेळताना अन्य कुणाला नाही जमलं ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं.
११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये ११ व्या क्रमांकावर वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगर याच्या नावे आहे. जुलै २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस कसोटी मालिकेतील नॉटिंघहॅम कसोटीत त्याने १०१ चेंडूत ९८ धावांची खेळी साकारली होती. या यादीत टीनो बेस्ट (९५), जेम्स अँडरसन (८१) आणि झहीर खान (७५) यांच्या पाठोपाठ आता रबाडा पाचव्या स्थानावर आहे.