T20 World Cup 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननेन्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तानसाठी चांगली झाली नव्हती. पण स्पर्धेच्या बाद फेरीत मात्र पाकिस्तानने वेग पकडला आणि आता अंतिम फेरी गाठणारा भारत पहिला संघ बनला. उपांत्य फेरीतील विजयावर पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले. पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनेलवर ही गोष्ट लाइव्ह पाहायला मिळाली. माजी क्रिकेटपटू शोएब मलिक, वकार युनूस, वसीम अक्रम आणि मिसबाह-उल-हक यांनी लाइव्ह शो मध्येच भन्नाट डान्स केल्याचे दिसले.
सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला, तेव्हा थेट टीव्हीवर जबरदस्त या आजी-माजी क्रिकेटपटूंनी धमाल नृत्य केले. पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्स चॅनलवर प्रत्येकजण तज्ञ म्हणून सामील होते. त्यावेळी सामना संपला तेव्हा येथे सर्वांनी जोरदार भांगडा केला. शोएब मलिक, वकार युनूसचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. यासोबतच पाकिस्तानच्या सोशल मीडियावर बाबर आझम आणि त्यांच्या संघाचे जोरदार कौतुक करण्यात आले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने येथे १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने शेवटच्या षटकांत केवळ ३ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून बाबर आझमने ५३ आणि मोहम्मद रिझवानने ५७ धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत दोघेही अपयशी ठरत होते, पण यावेळी दोघांनीही अशी अप्रतिम कामगिरी केली की त्यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत गाठून दिली.
यंदाच्या T20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी
vs भारत - 4 गडी राखून पराभूत
vs झिम्बाब्वे - 1 धावेने पराभव
vs नेदरलँड्स - 6 विकेट्सने विजयी
vs दक्षिण आफ्रिका - 33 धावांनी विजयी
vs बांगलादेश - 5 विकेट्सने विजयी
vs न्यूझीलंड - 7 विकेट्सने विजय (उपांत्य फेरी)
अंतिम - १३ नोव्हेंबर