Join us  

PAK vs NZ: पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली; माजी खेळाडूचा संताप!

PAK vs NZ: १८ एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:58 PM

Open in App

PAK vs NZ T20: न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. पुन्हा एकदा बाबर आझमच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ असणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलच्या कारणास्तव किवी संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे पाठ फिरवली. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा मोठा बदल करत निवड समिती बरखास्त केली. संघाचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिजला डायरेक्टर पदावरून काढल्यानंतर त्याने संताप व्यक्त केला होता. अशातच त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर होताच आक्रमक भूमिका घेत एक संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. आगामी मालिकेतून मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांची पाकिस्तानच्या संघात एन्ट्री झाली आहे. फिक्सिंगमुळे वादात सापडलेला आमिर आणि वसीम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि राजीनामा परत केला. 

मोहम्मद हाफिजने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली. एकूणच निवृत्त झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात स्थान दिल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. अशाने युवा खेळाडूंना संधी मिळत नसल्याचे त्याने पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे नमूद केले. 

पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर झमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद  रिझवान, मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान, झमान खान, 

राखीव खेळाडू - हसीबुल्लाह, मोहम्मद वसीम ज्युनिअर, शाहिबजादा फरहान आणि सलमान अली अघा.

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक १८ एप्रिल - रावळपिंडी२० एप्रिल - रावळपिंडी२१ एप्रिल - रावळपिंडी२५ एप्रिल - लाहोर २७ एप्रिल - लाहोर

पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.  

टॅग्स :पाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेटन्यूझीलंडटी-20 क्रिकेट