Join us

PAK vs NZ: पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे; न्यूझीलंडच्या निर्णयावर केलं ट्विट अन् ठरले 'Fool'!

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली मर्यादित षटकांची मालिका रद्द करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:15 IST

Open in App

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली मर्यादित षटकांची मालिका रद्द करण्यात आली. आजपासून ही मालिका वन डे सामन्यानं सुरू होणार होती, परंतु दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डांनं दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी क्रिकेटसाठी हा दुःखद दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा, कर्णधार बाबर आजम यांच्यासह अनेक आजी- माजी खेळाडूंनी किवींच्या निर्णयाची निंदा केली. PCBनंही ट्विट करून नाराजी व्यक्त केली, पण त्यांच्या इंग्लिश टायपिंगमध्ये चूक सापडली अन् नेटिझन्सनी त्यांना मुर्खात काढले. 

PCBनं Full Proof असे लिहिण्याएवजी Fool Proof असे लिहिले अन् नेटिझन्सनी त्यांची शाळा घेतली.  

** 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड
Open in App