ठळक मुद्देन्यूझीलंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजयअवघ्या चार धावांनी दिली मातफिरकीपटू अजाझ पटेल विजयाचा शिल्पकार
अबुधाबी : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने अवघ्या चार धावांनी विजय मिळवला. रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडचा अजाझ पटेल चमकला, त्याने पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. या ऐतिहासिक विक्रमानंतर किवी संघाने ड्रेसिंग रुममध्ये भांगडा केला. कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंडचा हा सर्वात कमी धावांनी मिळवलेला विजय ठरला. याआधी त्यांनी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियावर 7 धावांनी विजय मिळवला होता.
विजयासाठीच्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात आश्वासक झाली नाही. अझर अलीले एकाकी किल्ला लढवून पाकिस्तानचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण अवघ्या पाच धावा असताना तोच पायचीत झाला आणि न्यूझीलंडने विजयोत्सव साजरा केला. अलीने 65 धावांची खेळी साकारली. पाकिस्तानच्या तळाच्या चार फलंदाजांना यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
डावखुरा फिरकीपटू अजाझने 59 धावा देत फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी पाकिस्तानला पहिला आणि शेवटचा धक्का पटेलनेच दिला. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला त्याने बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अझरला बाद करत पटेलने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भांगडा करत आनंद साजरा केला.
पाहा व्हिडीओ...