Join us

पाकिस्तानची इभ्रत गेली! हॅरीस रौफ, शाहीद आफ्रीदी यांच्यात नकोशा विक्रमाची खांदेपालट

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 15:23 IST

Open in App

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.  वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ३ वेळआ ४०० प्लस धावांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे आणि त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ( प्रत्येकी १) यांचा क्रमांक येतो.  

केन ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रचिन रवींद्रही ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावांवर बाद झाला.  डॅरील मिचेल ( २९ ) ने  मार्क चॅम्पमनसह ३२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. चॅम्पमन ३९ धावांवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स व मिचेल सँटनर यांनी २६ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. सँटनरने १७ चेंडूंत २६ धावा चोपल्या. 

वन डे क्रिकेटमधील न्यूझीलंडची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यांनी २००८मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ४०२ धावा केल्या होत्या.  पाकिस्तानचा गोलंदाज हॅरीस रौफ याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक १६ षटकार खाणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तसेच वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा ( १-८५) गोलंदाजही तो ठरला होता. पण, १० मिनिटांत शाहीन आफ्रीदीने हे नकोसे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतले. त्याने आज १० षटकांत एकही विकेट न घेता ९० धावा दिल्या. हसन अलीने २०१९मध्ये भारताविरुद्ध १ बाद ८४ अशी स्पेल टाकली होती. शाहीन आफ्रिदीने वन डेत सलग २३ इनिंग्जमध्ये किमान एक विकेट घेतली आहे, परंतु आज ही मालिका खंडीत झाली. 

पाकिस्तानच्या तीन गोलंदाजांनी हॅरिस रौफ ( १-८५), हसन अली ( १-८२) व शाहीन ( ०-९०) यांनी ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा दिल्या. २०१५ मध्ये अफगाणिस्तानच्या ३ गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाने अशी धुलाई केली होती. तर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेच्या ४ गोलंदाजांना असे बेक्कार चोपले होते.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानन्यूझीलंड