Join us

सचिननंतर रचिन...! किवी फलंदाजाने इतिहास रचला, बाबर आजमचा विक्रम मोडला

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई झालेली पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:58 IST

Open in App

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई झालेली पाहायला मिळतेय. बंगळुरूच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन यांची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या रचिनने आज पुन्हा विक्रमी कामगिरी करताना सचिन तेंडुलकरनंतर मोठा मान मिळवला.

नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् तो त्यांच्या अंगलट आल्या. त्यात न्यूझीलंड तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरले, तर पाकिस्तानने दोन पार्ट टाईम फिरकीपटूंच्या जीवावर आव्हान देण्याचे धाडस केले. पाकिस्तानच्या या निर्णयावर त्यांच्या चाहत्यांनीही टीका केली, कारण पाकिस्तानी गोलंदाजांनी बेक्कार धुलाई झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. कॉनवे ३५ ( ३९ चेंडू) धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन चांगले फटकेबाजी करताना दिसली. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या रचिनने पाचवेळा ५०+ केल्या आहेत आणि वर्ल्ड कप पदार्पणात सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तित रचिनने स्थान पटकावले.  

रचिन व केन यांनी पाकिस्तानच्या पार्ट टाईम फिरकीपटूंना चोप दिला. केननेही या वर्ल्ड कपमधीत त्याचे दोन डावातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. रचिनला रोखणं पाकिस्तानला अवघड झालं होतं अन् यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ५०० प्लस धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ५०० प्लस धावा करणारा तो दुसरा युवा फलंदाज ठरला. त्याने २३ वर्ष व ३५१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला, तर सचिन तेंडुलकरने २२ वर्ष व ३२४ दिवसांचा असताना हा पराक्र केला होता. रचिनने आज बाबर आजमला ( ४७४) मागे टाकले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडपाकिस्तान