Join us  

Ben McDermott, PAK vs AUS 2nd ODI : ३ सामन्यांचा अनुभव असलेल्या फलंदाजाने पाकिस्तानला धुतले; LSGच्या Marcus Stoinis नेही हात साफ केले 

PAK vs AUS 2nd ODI : पहिल्या वन डेती लाजीरवाण्या पराभवानंतरही पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये काही सुधारणा झालेली दिसली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 7:30 PM

Open in App

PAK vs AUS 2nd ODI : पहिल्या वन डेती लाजीरवाण्या पराभवानंतरही पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये काही सुधारणा झालेली दिसली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या वन डे सामन्यातही यजमानांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या वन डेतील ३००+ लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ८८ धावांनी हार पत्करावी लागली होती. आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी त्यापुढे मजल मारून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

कर्णधार आरोन फिंच ( ०) याला लगेच बाद केल्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीने आनंद व्यक्त केला, पण त्यानंतर मागच्या सामन्यातील शतकवीर ट्रॅव्हीस हेड व बेन मॅकडेर्मोट यांनी ईंगा दाखवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. हेड ७० चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ८९ धावा करून बाद झाला. पण, तीन वन डे सामन्यांचा अनुभव असलेला बेन पाकिस्तानी गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने १०८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो १००० वा पुरुष क्रिकेटपटू ठरला.  

त्यानंतर मार्नस लाबुशेन व मार्कस स्टॉयनिस यांनी फटकेबाजी केली. लाबुशेन ४९ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला, तर स्टॉयनिसने ३३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४९ धावा चोपल्या. सीन अबॉटने १६ चेंडूंत २८ धावा कुटल्या आणि ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा केला. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान
Open in App