दुवा मे याद रखना; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूचं ट्विट

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) सुरक्षेची हमी दिल्यानंतर आणि पाहणी करून खात्री पटल्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघानं पाक दौरा करण्याची तयारी दर्शवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:22 IST2020-01-23T13:15:36+5:302020-01-23T13:22:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PAK v BAN : "Remember us in your prayers", tweets Mustafizur before departing for Pakistan | दुवा मे याद रखना; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूचं ट्विट

दुवा मे याद रखना; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूचं ट्विट

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) सुरक्षेची हमी दिल्यानंतर आणि पाहणी करून खात्री पटल्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघानं पाक दौरा करण्याची तयारी दर्शवली. राजकीय परिस्थिती आणि दहा वर्षांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक दौऱ्यावर कोणताही आंतरराष्ट्रीय संघ गेला नव्हता. पण, 2019मध्ये श्रीलंकेनं पाक दौरा केला आणि उभय संघांतील मालिका यशस्वी झाली. त्यानंतर पाक दौऱ्यावर जाणारा बांगलादेश हा दुसरा संघ ठरला आहे. पण, अजूनही बांगलादेशच्या खेळाडूंच्या मनात सुऱक्षिततेबाबत धाकधूक आहे आणि म्हणूनच दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांच्या एका खेळाडूंनं आमच्यासाठी प्रार्थना करा, असं ट्विट केलं.
 


तीन ट्वेंटी-20, दोन कसोटी आणि एक वन डे सामन्यांच्या या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ बुधवारी रात्री पाकिस्तानात दाखल झाला. 12 वर्षांनंतर बांगलादेशचा संघ पाक दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी बांगलादेशचा गोलंदाज मुश्ताफिजूर रहमाननं ट्विट केलं. त्यात त्यानं लिहिलं की, पाकिस्तानमध्ये जात आहोत. दुवा मे याद रखना.'' 

त्यावर नेटिझन्सकडून भन्नाट उत्तरं...
 


Web Title: PAK v BAN : "Remember us in your prayers", tweets Mustafizur before departing for Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.