Join us  

शंभरावी कसोटी जिंकण्याची संधी, २१ व्या शतकात भारताने जिंकले ९९ सामने

ICC World Test Championship: १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल खेळली जाईल. हा सामना जिंकल्यास भारताचा शंभरावा विजय ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:11 AM

Open in App

नवी दिल्ली - विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी २१ व्या शतकात आतापर्यंत भारताने ९९ कसोटी विजय साजरे केले. १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल खेळली जाईल. हा सामना जिंकल्यास भारताचा शंभरावा विजय ठरणार आहे. (Opportunity to win the 100th Test, India won 99 matches in the 21st century)एक जानेवारी २००१ पासूृन भारताने २१४ सामने खेळले असून त्यात ९९ विजय आणि ५७ पराभवाची नोंद आहे. ३६ सामने अनिर्णीत राहिले. ऑस्ट्रेलियाने २२४ पैकी १३० सामने जिंकले तर ५८ सामन्यात त्यांचा पराभव झाला. इंग्लंडने २५८ पैकी १५५ सामने जिंकले आहेत. ८५ सामन्यांत हा संघ पराभूत झाला.भारताने २० व्या शतकात ३३६ सामने खेळून केवळ ६३ जिंकले. १९३२ पासून भारतीय संघ कसोटी मैदानात आहे. अर्थात शंभर सामने जिंकण्याचा योग प्रथमच आला आहे. 

एका कसोटीच्या आधारे विजेता ठरू नये - कपिलडब्ल्य  यूटीसी चॅम्पियनचा निर्णय एका कसोटीच्या आधारे होऊ नये. किमान तीन सामने खेळवून विजेता निश्चित व्हावा, असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही संघांत भेदक गोलंदाजांचा भरणा आहे. मात्र, उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर भारत विजेता बनू शकतो, असे मतदेखील १९८३ च्या विश्वविजेत्या नायकाने व्यक्त केले. ते म्हणाले, ‘महत्त्वपूर्ण चॅम्पियनशिपच्या विजेत्याचा निर्णय एका सामन्याआधारे नव्हे तर किमान तीन सामने आयोजित करून व्हायला हवा. सध्याची वेळ तीन सामन्यांच्या आयोजनाची नसली तरी भविष्यात आयसीसीने याविषयी विचार करायला हवा.’

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड