Join us  

सलामीला खेळण्याची संधी मिळणे वरदान; वॉशिंग्टन सुंदर याचे मत

वॉशिंग्टनने गाबामध्ये पहिल्या डावात ६२ धावांची खेळी करीत भारताचे आव्हान कायम राखले आणि दुसऱ्या डावात २२ धावांची आक्रमक खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 5:49 AM

Open in App

नवी दिल्ली : प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये दिलेली ‘दृढता व प्रतिबद्धता’ याची शिकवण युवा वॉशिंग्टन सुंदरसाठी ‘टॉनिक’ ठरली. तो कुठल्याही आव्हानासाठी सज्ज आहे. त्यात कसोटी सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करण्याचाही समावेश आहे.२१ वर्षीय वॉशिंग्टन भारताच्या अंडर-१९ संघात आघाडीच्या फळीतील स्पेशालिस्ट फलंदाज होता, पण त्याने आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीमध्ये सुधारणार केली आणि भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले.

ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वॉशिंग्टन चेन्नईहून वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हणाला,‘जर मला कधी भारतीय संघातर्फे कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली तर ते माझ्यासाठी वरदान ठरले. माझ्या मते हे आव्हान मी आमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीत जसे स्वीकारले त्याच पद्धतीने स्वीकारले. ’

वॉशिंग्टनने गाबामध्ये पहिल्या डावात ६२ धावांची खेळी करीत भारताचे आव्हान कायम राखले आणि दुसऱ्या डावात २२ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर लगावलेल्या षटकाराचाही समावेश होता. या व्यतिरिक्त त्याने चार बळीही घेतले. तो म्हणाला,‘रवी सरांनी आम्हाला आपल्या खेळाच्या दिवसातील प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. उदा. त्यांनी स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून पदार्पण केले आणि चार बळी घेतले आणि न्यूझिविरुद्धच्या लढतीत दहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यानंतर ते कसोटीमध्ये कसे सलामीवीर फलंदाज बनले आणि त्यांच्या काळातील सर्व दिग्गज वेगवान गोलंदाजांना कसे सामोरे गेले, हे त्यांनी सांगितले. मला त्यांच्याप्रमाणे कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करायला आवडेल.’

शास्त्री यांच्या मते संघातील युवा खेळाडूसाठी बाहेरच्या खेळाडूकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही. कारण भारतीय ड्रेसिंग रुममध्ये अनेक आदर्श खेळाडू आहेत. वॉशिंग्टन म्हणाला, ‘त्यामुळे निश्चितच मला मदत झाली. कारण मला कसोटी सामन्यासाठी थांबण्यास सांगण्यात आले होते. पण, ती आमचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण सरसह सर्व प्रशिक्षकांची रणनीती होती. त्याचा लाभ झाला.’

प्रेरणा घेण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये अनेक खेळाडूवॉशिंग्टन म्हणाला,‘ युवा असल्यामुळे ज्यावेळी कुणाकडून प्रेरणा घेण्याची इच्छा होते त्यावेळी मला माझ्या ड्रेसिंग रुममध्येच अनेक आदर्श खेळाडू दिसतात. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन यांच्यासारखे शानदार कामगिरी करणारे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये आहेत. हे खेळाडू नेहमी तुमची मदत करण्यासाठी सज्ज असतात.’ एकदिवसीय मालिका संपल्यानंतर वॉशिंग्टनला नेट गोलंदाज म्हणून संघासोबत राहण्यास सांगितले होते. 

टॅग्स :भारतवॉशिंग्टन सुंदर