Join us

टीम इंडियाच्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

एडुल्जींच्या असहमतीनंतरही सीएसीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:51 IST

Open in App

नवी दिल्ली: प्रशासकांच्या समितीने डायना एडुल्जी यांनी केलेल्या विरोधानंतरही कपिल देव यांच्या नेतृत्वातील सल्लागार समितीला परस्पर हितसंबंधांच्या मुद्यावर २-१ अशी मंजुरी दिली आहे. त्यासोबतच भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.एडुल्जी यांचे मत समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि अन्य सदस्य लेफ्टनंट जनरल सेवा निवृत्त रवी थोडगे यांच्या मतापेक्षा वेगळे होते. सीओएच्या बैठकीनंतर एडुल्जी यांनी सांगितले की, ‘हा निर्णय २-१ ने झाला मी त्याला विरोध केला होता. या प्रकरणाला डी.के. जैन यांच्याकडे पाठवायला पाहिजे होते. त्यात हितसंबंध गुंतल्याच्या प्रकरणात निर्णय व्हायला पाहिजे होता. तदर्थ समिती संविधानात नाही.’ कपिल देव यांच्या नेतृत्वातील नव्या तदर्थ क्रिकेट सल्लागार समितीत दोन अन्य सदस्य अंशुमन गायकवाड आणि डब्ल्यू. व्ही. रमण यांचा समावेश आहे. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे एडुल्जी यांचे म्हणणे आहे.