Join us

त्यानंतरच सराव सामन्यात खेळण्याचा निर्णय : विराट कोहली

Virat Kohli News : भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 04:51 IST

Open in App

सिडनी : भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत ॲडिलेडमध्ये खेळल्या जाईल. कोहली या लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्यानंतर आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोहली म्हणाला,‘सराव सामन्यात खेळू शकतो किंवा नाही हे बुधवारी सकाळी जाग आल्यानंतर समजेल. यात खेळायचे किंवा नाही हा निर्णय माझ्या हातात नाही. मला कुठल्याही सामन्यात खेळणे आवडते. मी आपल्या फिजिओकडे जाणार असून त्यानंतर या लढतीत खेळण्याबाबत निर्णय घेईल.’सामन्याबाबत बोलताना कोहली म्हणाला,‘आम्ही पुनरागमन करण्याची व प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची पद्धत शोधत आहोत. मालिका विजयामुळे २०२० च्या मोसमाचा शानदार शेवट केला.’कोहली म्हणाला,‌‘ हार्दिकने मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी आम्हाला लक्ष्य गाठण्याची आशा होती. मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी केली त्याची आम्हाला झळ बसली.’

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली