Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानलं भावा; एक पाय नसतानाही करतोय लै भारी फलंदाजी; 50 हजारवेळा पाहिला गेलाय Video

आयपीएलमध्ये होणाऱ्या फटकेबाजीपेक्षा आहे की नाही लै भारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:57 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात मागील तीन महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. यंदा मार्च-एप्रिलमध्ये रंगणाला इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) थरारही क्रिकेट चाहत्यांना अऩुभवता आलेला नाही. त्यामुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ती तुफान फटकेबाजी पाहण्यासाठी सर्वच आतुर झाले आहेत. कोरोना संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. तसे झाल्यास बीसीसीआय त्या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे. पण, तोपर्यंत चाहत्यांना इंग्लंड-वेस्ट इंडिज आणि इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील कसोटी व ट्वेंटी-20 मालिकेवर समाधान मानावे लागणार आहे.

भारतीय संघाचे क्रिकेट कधी सुरू होईल, याची खात्री आताच देता येणार नाही. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तंदुरुस्त फलंदाजांना लाजवेल असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील तरुणानं एक पाय गमावला आहे, परंतु तरीही एका पायावर उभं राहून तो तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात तुम्ही खचला असाल, तर हा व्हिडीओ नक्की तुम्हाला जगण्याचं बळ देईल. आतापर्यंत जवळपास 50 हजार वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्... 

टॅग्स :सोशल व्हायरल