Join us  

मोहम्मद शमीच्या घरी हलला पाळणा, जन्माला आली कन्या!

भारतीय संघानं न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 5-0 अशी जिंकून इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीचा महत्त्वाचा वाटा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 6:50 PM

Open in App

भारतीय संघानं न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 5-0 अशी जिंकून इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं अखेरच्या षटकात न्यूझीलंडच्या तोंडाशी असलेला विजयाचा घास पळवला होता आणि टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये तिसरा सामना जिंकून मालिका विजय निश्चित केला होता. या मालिका विजयानंतर मोहम्मद शमीला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. त्याच्या घरी पाळणा हलला आहे. शमीनं इंस्टाग्रामवर चिमुरड्या मुलीचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.

NZ vs IND : Rohit Sharmaची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यात बऱ्याच महिन्यांपासून वाद सुरू आहे. हसीनने तर शमीविरोधात पोलिस तक्रारही केली आहे. शिवाय हसीननं शमीच्या मोठ्या भावावर बलात्कार केल्याचा आरोपही केला आहे. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाला अटक करण्यात आली होती. पण, शमीनं या गोष्टी मागे सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. त्यानं मागील 12 महिन्यांत 7 कसोटी सामन्यांत 31 विकेस्ट घेतल्या. शिवाय कसोटी क्रमवारीत त्यानं टॉप टेन मध्येही प्रवेश केला. वन डे क्रिकेटमध्ये 18 सामन्यांत त्यानं 37 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 4 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आणि त्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या हॅटट्रिकचा समावेश आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावरही शमीनं भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यात त्यानं अखेरच्या षटकात सामनाच फिरवला होता. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं हा सामना जिंकला होता. या ऐतिहासिक मालिका विजयानंतर शमीच्या कुटुंबात आनंदवार्ता आली आहे. त्याच्या घरी पाळणा हलला आहे. त्यानं इंस्टावर लिहीले की,'' माझ्या घरी सुंदर कन्येचा जन्म झाला आहे. नन्ही राजकुमारीचे स्वागत. या जगात तुझे स्वागत आहे. भावाला खुप खुप शुभेच्छा. ''  

भावाला मुलगी झाल्याची गोड बातमी शमीनं सर्वांसोबत शेअर केली. 

ICC T20I Rankings मध्ये KL Rahulची गरूड झेप; विराट, रोहित यांनाही टाकलं मागे

लोकेश राहुलचा एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार अन् विंडीज दिग्गजाचं बेस्ट ट्विट!

Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!

विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध न्यूझीलंड