Join us

एकदिवसीय क्रमवारीत झुलन अव्वल स्थानी, आयसीसी महिला क्रमवारी

इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:06 IST

Open in App

दुबई : इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्येही अव्वल स्थान पटकावणाऱ्या झुलनने मालिकेत ८ बळी घेतले. त्यामुळे भारताने चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान गाठले. न्यूझीलंड व अव्वल चार संघ २०२१विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. आॅस्ट्रेलिया १२ सामन्यांत २२ गुणांसह अव्वल स्थानी असून भारत १५ सामन्यांत १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. झुलन एकदिवसीय क्रमवारीत सर्वाधिक वेळ अव्वल स्थानी राहण्याच्या विक्रमासमीप पोहोचली आहे. झुलन १,८७३ दिवस जगातील अव्वल गोलंदाज ठरली आहे. यापेक्षा अधिक कालावधीत आॅस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट््जपॅट्रिक हिने २,११३ दिवस अव्वल स्थान भूषविले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ