Join us

क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंग; धावा न करण्यासाठी सलामीवीराने पैसे घेतल्याचे उघड

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे सर्वांनीच पाहिले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 11:52 IST

Open in App

मुंबई : फिक्सिंगची कीड क्रिकेटला पोखरून काढत असल्याचेच सध्या पाहायला मिळत आहे. कारण सध्या एक स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे सर्वांनीच पाहिले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवरही बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर भारतातील कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये फिक्सिंग झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हे स्पॉट फिक्सिंग पाकिस्तानच्या सलामीवीराने केल्याचे पुढे आले आहे. डावाच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंवर एकही धाव न काढण्यासाठी त्याने पैसे घेतल्याचे पुढे आले आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ही गोष्ट २०१६ साली घडली होती. पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासिर जमशेदने हे क्रिकेटला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. या एका गोष्टीवर तो थांबला नाही. २०१७ साली पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्येही त्याने असेच कृत्य केले होते. युसूफ अन्वर आणि एजाज अहमद या दोघांनी नासिरला यासाठी पैसे दिले होते. या दोघांनीही नासिरने स्पॉट फिक्सिंग केल्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश