Join us  

पुन्हा एकदा भारतात मॅच फिक्सिंग; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींचा मोठा खुलासा

भारतामध्ये मॅच फिक्सिंग अजूनही संपलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:07 PM

Open in App

मुबंई : भारतातील मॅच फिक्सिंग काही कमी होताना दिसत नाही. सध्याच्या घडीलाही भारतामध्ये मॅच फिक्सिंगचे प्रयत्न सुरुच आहे. याबाबत दस्तुरखुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच मोठा खुलासा केला आहे.

भारतामध्ये मॅच फिक्सिंग अजूनही संपलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचे गांगुली यांनी मान्य केले आहे. आता मॅच फिक्सिंगचा पेच कसा सोडवायचा, हा यक्षप्रश्न गांगुली यांच्यापुढे उभा आहे.

याबाबत गांगुली यांनी सांगितले की, " भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवली गेली होती. या स्पर्धेत एका खेळाडूशी सट्टेबाजाने संपर्क साधला होता. हा सट्टेबाज नेमका कोण आहे, हे मात्र समजू शकलेले नाही. पण ही फार वाईट गोष्ट आहे. आता ही गोष्ट कशी रोखू शकतो, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे."

बीसीसीआयने भारताच्या खेळाडूवर घातली तीन वर्षांची बंदी; केले निंदनीय कृत्य...भारताच्या एका खेळाडूने निंदनीय कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर बीसीसीआयने तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक स्पर्धेचे काही नियम असतात. त्याचबरोबर आपण एक खेळाडू म्हणून कसे वागायला हवे, हेदेखील प्रत्येकाला माहिती असायला हवे. खेळाचे काही नियम असतात, पण या खेळाडूंने तर नियमांना हरताळ फासत वाईट गोष्ट केल्याचे समोर आले आहे. जेव्हा बीसीसीआयला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्यावर थेट तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान झाल्यानंतर काही योग्य निर्णय पाहायला मिळाले. खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा जपण्यासाठी गांगुलीने काही पावले उचलली आहेत. जो खेळाशी प्रतारणा करेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, हे गांगुली यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

भारताच्या एका खेळाडूने वयचोरी करण्याचा गुन्हा केला आहे. हा खेळाडू आपला जन्म १२ डिसेंबर २००१ या दिवशी झाल्याचे सांगत होता. त्यामुसार तो १९ वर्षांखालील संघात खेळत होता. पण त्याच्या शाळेतील दाखल्यामध्ये १० जून १९९६ ही जन्मतारीख दाखवत आहे आणि त्याच्या जन्माचा दाखलाही मिळालेला आहे. त्यामुळे वयचोरी करत या खेळाडूने खेळाला बदनाम केले आहे. त्यामुळे त्याच्यावर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या खेळाडूचे नाव प्रिन्स राम निवास यादव, असे आहे. हा खेळाडू दिल्लीच्या संघातून खेळत होता. त्याचबरोबर या खेळाडूने दहावीची परीक्षाही पास केलेली असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय