Join us  

OMG! ...ऑस्ट्रेलियाने फक्त एकच चूक केली आणि काय घडले, पाहा व्हिडीओ...

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची ऑस्ट्रेलियाला सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती गमावली. या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 9:10 PM

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने या सामन्यात धक्कादायक विजयाची नोंद केली. पण या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची ऑस्ट्रेलियाला सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती गमावली. या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

यावेळी बेन स्टोक्सने अखेरच्या फलंदाजबरोबर खिंड लढवली. या भागीदारीदरम्यान स्टोक्सच्या चुकीमुळे अखेरचा फलंदाज जॅल लीच धावचीत होणार होता. पण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑनकडून गफलत झाली आणि लीचला जीवदान मिळाले.

पाहा हा व्हिडीओ

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 2 फलंदाज 15 धावांत माघारी परतले. पण बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, जोश हेझलवूड ( 5/30), पॅट कमिन्स ( 3/23) आणि जेम्स पॅटिन्सन ( 2/9) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडसाठी रुट व डेन्ली यांनी इंग्लंडचा डाव सावरला. रुटने 205 चेंडूंत 77, तर डेन्लीने 155 चेंडूंत 50 धावा केल्या. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी संघर्ष केला, पण हेझलवूडने बेअरस्टोला माघारी पाठवले. मात्र स्टोक्सने अखेरपर्यंत एकट्याने खिंड लढवत धावा 135  केल्याने इंग्लंडला 1 विकेट्सने विजय मिळवता आला.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019बेन स्टोक्सइंग्लंडआॅस्ट्रेलिया