Join us  

OMG... फलंदाज असा पण आऊट होऊ शकतो, पाहा घडलेला हा धक्कादायक प्रकार

मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय करावे ते सुचले नाही, कारण यापूर्वी अशी घटना त्यांनीही पाहिली नसावी.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 4:26 PM

Open in App

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट जगतामध्ये बऱ्याच अजब गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. एका सामन्यात तर फलंदाज ज्यापद्धतीने बाद झाला, ते यापूर्वी पाहायला मिळाले नव्हते. हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून तो पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय करावे ते सुचले नाही, कारण यापूर्वी अशी घटना त्यांनीही पाहिली नसावी. पण दुसरीकडे मात्र खेळाडूंनी हा सारा प्रकार खेळभावनेने घेतला आणि अनर्थ टळला.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावांवर फलंदाजी करत होती. त्यावेळी तिने हिथर ग्रॅहमच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह लगावला. हा चेंडू थेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिनच्या बॅटवर आदळला. त्यानंतर या चेंडूला गोलंदाज ग्रॅहमने टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पंचांकडे कॅचचे अपील केले. मैदानावरील पंचांनाही नेमके काय करावे, ते समजले नाही. मैदानावरील पंचांनी यावेळी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी पेरकिन्स बाद असल्याचा निर्णय दिला आणि क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच फलंदाज असे बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा खास व्हिडीओ

 

न्यूझीलंडच्या बाबतीत हा प्रकार घडला असला तरी त्यांनीच हा सामना जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 323 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 157 धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने हा सामना 166 धावांनी जिंकला.

काही दिवसांपूर्वी असा विचित्र प्रकार घडला होता

ऑस्ट्रेलियामधील एका सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यामध्ये एक सामना खेळवला जात होता. हा सामना न्यू साऊथ वेल्स संघाने जिंकला. पण या सामन्याच्या चौथ्या दिवशी ही धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी चौथ्या दिवसाच्या 47व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. न्यू साऊथ वेल्स संघाचा जेसन संघा यावेळी गोलंदाजी करत होता, तर दक्षिण ऑस्ट्रेलियाचा हिल्टन कार्टराइट फलंदाजी करत होता. 47व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हिल्टनने पूलचा फटका मारला. त्यावेळी हा चेंडू शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर हा चेंडू हेल्मेटला लागून उंच उडाला आणि जेसनने आपल्याच गोलंदाजीवर असा चम्तकारीक झेल पकडला. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियान्यूझीलंड