Join us

OMG! तीन वर्षे एकही सामना न खेळता तो झाला थेट कर्णधार...

जर एखादा खेळाडू तीन वर्षांपासून संघात खेळतच नसेल आणि जर त्याला संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर... खरंतर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:29 IST

Open in App

नवी दिल्ली : एखादा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत असेल आणि त्याच्यामध्ये चांगले नेतृत्वगुण असतील, तर त्याला संघाची कमान सोपवण्यात येऊ शकते. पण जर एखादा खेळाडू तीन वर्षांपासून संघात खेळतच नसेल आणि जर त्याला संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर... खरंतर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. कारण असं कसं होऊ शकतो, असा विचार तुम्ही करत असाल. पण काही दिवसांमध्येच ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळू शकते.

भारताने वेस्ट इंडिजचा तिन्ही क्रिकेटच्या प्रकारांमध्ये धूळ चारली. त्याचबरोबर त्यांना विश्वचषकातही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे भविष्यात हा संघ चांगली कामगिरी करेल का, असा प्रश्न त्यांच्या निवड समितीला पडला होता. त्यामुळे आता त्यांनी नेतृत्व बदलायचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिजच्या संघाचे वनडे आणि ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद अनुक्रमे जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडे होते. पण आता वेस्ट इंडिजच्या संघाचे नेतृत्व कायरन पोलार्डकडे जाऊ शकते. त्यामुळे आता काही दिवसांमध्येच वेस्ट इंडिजला नवा कर्णधार मिळणार आहे. पोलार्ड 2016 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

टॅग्स :वेस्ट इंडिज