Join us

ओह नो; युजवेंद्र चहलवर Sorry म्हणायची वेळ का आली?

भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलवर Sorry म्हणण्याची वेळ आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 19:23 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलवर Sorry म्हणण्याची वेळ आली आहे. एकदा नाही तर तब्बल अनेक वेळा त्याला माफी मागावी लागली. त्याच्या एका मॅसेजने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 मालिकेत चहलला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे 'ऑन फिल्ड' नसलेला चहल 'ऑफ फिल्ड' चर्चेत आहे. 

चहलने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका मुलीला मॅसेज केला. पण, तसे करताना तो मॅसेज प्रायव्हेट ठेवण्यास तो विसरला आणि गोंधळ झाला. त्या 20 वर्षीय मुलीने इंस्टावरील मॅसेजचा स्क्रीनशॉट घेत सोशल मीडियावर फिरवला. आपली चुक लक्षात येताच चहलने माफी मागितली, परंतु तोपर्यंत नेटिझन्सनी त्याची चांलगीच खिल्ली उडवली होती. चहलने त्या मुलीने पोस्ट केलेल्या फोटोवर ''Nice one" असे लिहीले. नंतर काय झाले तुम्हीच पाहा...  

टॅग्स :युजवेंद्र चहलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज