Join us

युवीनंतर चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज शोधणे आव्हानात्मक झालेय; रोहित शर्माने वाढवली चिंता

ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक काल अखेर आयसीसीने जाहीर केले. ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:11 IST

Open in App

ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक काल अखेर आयसीसीने जाहीर केले. ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याचाही समावेश आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तरीही भारत अजूनही २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ज्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यास अपयशी ठरला होता, तोच प्रश्न पुन्हा समोर आला आहे. युवराज सिंग याच्या निवृत्तीनंतर भारताला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सक्षम पर्यात शोधता आलेला नाही आणि कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) याची प्रांजळ कबुली दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहितच्या या विधानाने मात्र चाहत्यांची चिंता वाढलेली आहे. 

श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकासाठी दावा सांगितला होता आणि त्याने खरंच चांगली कामगिरीही केली होती. त्याने २० सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४७.३५ च्या सरासरीने ८०५ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ''हे पाहा, चौथ्या क्रमांकाची समस्या ही आमच्यासाठी नवीन नाही. मागील बऱ्याच काळापासून याचा आम्हाला सामना करावा लागला आहे. युवराज सिंगनंतर तसा सक्षम पर्याय नाही मिळाला, परंतु मागील काही कालावधीत श्रेयसने या क्रमांकावर चांगली कामगिरी केली. त्याचे आकडे खूप चांगले आहेत,''असे रोहितने सांगितले.  

तो पुढे म्हणाला,''दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आणि आम्ही पुन्हा अडचणीत सापडलो. तो बराच काळ मैदानापासून दूर आहे आणि हे मागील ४-५ वर्षांत असेच काही घडत आले आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाली आणि नेहमीच आपल्याला त्या क्रमांकावर नवा खेळाडू खेळताना दिसतो. जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो, तेव्हा आम्हाला प्रयोग करावे लागतात.''   

''कर्णधार होण्याआधीही, मी पाहायचो की अनेक खेळाडू आले अन् गेले. पण, दुखापतीमुळे त्यांना बाहेर जावे लागले. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर मागील ४ महिन्यांपासून NCA मध्ये आहेत. ते कठोर मेहनत घेत आहेत आणि सध्यातरी चित्र सकारात्मक दिसतंय. फिंगर क्रॉस,''असे रोहित म्हणाला.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्मायुवराज सिंग
Open in App