Join us

ODI World Cup 2023: अंतराळातून लॉन्च झाला विश्वचषक! पृथ्वीपासून १२,५०० फुट उंचावरून अनावरण

भारतात यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आयसीसीने चक्क अंतराळातून लॉन्च केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 00:03 IST

Open in App

दुबई : भारतात यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आयसीसीने चक्क अंतराळातून लॉन्च केली आहे. नरेेंद्र मोदी स्टेडियमवर ही ट्रॉफी उतरविण्याआधी तिला पृथ्वीपासून १ लाख २० फूट उंच सोडण्यात आले होते. यासाठी विशिष्ट स्ट्रेटोस्फेरिक फुग्याचा वापर करण्यात आला होता.

विश्वचषक ट्रॉफीच्या या अनोख्या दौऱ्यावेळी एकूण चार कॅमेऱ्यांच्या साहाय्याने काही नेत्रदीपक फोटोग्राफ काढण्यात आले. २०२३ विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ट्रॉफीचा हा प्रवास फार मोठा असणार आहे. देशोदेशींच्या विविध शहरांत ही ट्रॉफी चाहत्यांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वन डेत दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला; भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

आयसीसीने जाहीर केल्यानुसार, आज २७ जूनपासून या ट्रॉफीच्या प्रवासाला भारतातून सुरुवात होईल. ही ट्रॉफी एकूण १८ देशांमधून नेण्यात येणार आहे.

यावर्षी भारतात होणार्‍या विश्वचषक २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) ने अतिशय अनोख्या पद्धतीने केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये विश्वचषक ट्रॉफी अंतराळात पाठवण्यात आल्याची दिसत आहे.

पहिल्यांदाच क्रीडा ट्रॉफीला अंतराळात पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तिथे त्या ट्रॉफिचे अनावरण करण्यात आले. या वर्षी वर्ल्ड कप २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि BCCI त्याचे वेळापत्रक उद्या २७ जून रोजी जाहीर करणार आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्ड
Open in App