ठळक मुद्देभारतीय महिला संघाची न्यूझीलंड दौऱ्यात विजयी सुरुवातपहिल्या वन डे सामन्यात यजमानांवर 9 विकेट राखून मातस्मृती मानधनाचे विक्रमी चौथे शतक, जेमिमा रॉड्रीग्जच्या नाबाद 81 धावा
नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य जेमिमा रॉड्रीग्ज ( नाबाद 81) आणि स्मृती मानधना ( 105) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना 9 विकेट राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूने पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखेच विजयाचे सेलिब्रेशन केले.
भारतीय पुरुष संघाने मंगळवारी न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात आठ विकेट्सने पराभूत केले. सामना संपल्यावर कोहली एका 'सेगवे' या दुचाकीवर उभा राहीला होता. या दुचाकीवरून त्याने मैदानात फेरफटकाही मारला. त्यानंतर कोहलीने चक्क धमेंद्र यांच्या खास स्टाईलमध्ये एक हात डोक्यावर आणि दुसरा हात कंबरेवर ठेवून डान्सही केला. कोहलीनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही 'सेगवे'चा आनंद लुटला.
बुधवारी महिला संघाच्या सामन्यानंतरही असेच चित्र पाहायला मिळाले. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी 33 षटकात पूर्ण केले. स्मृतीने 104 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 105 धावा केल्या. धावफलकावर 190 धावा असताना स्मृती माघारी परतली. जेमिमाने 94 चेंडूंत 9 चौकार खेचून नाबाद 81 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेमिमा व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना विक्रम केला. सामन्यानंतर भारतीय संघातील सदस्य मानसी जोशीने 'सेगवे' या दुचाकीची सफर केली.
पाहा व्हिडीओ...