India VS New Zealand 3rd ODI Winner : न्यूझीलंडचा तिसऱ्या सामन्यातही भारतावर विजय; काढला वचपा

India VS New Zealand 3rd ODI Winner : न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभूत करत ही मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:02 PM2020-02-11T15:02:35+5:302020-02-11T15:07:30+5:30

whatsapp join usJoin us
NZvsIND, 3rd ODI: New Zealand win over India 3rd odi match | India VS New Zealand 3rd ODI Winner : न्यूझीलंडचा तिसऱ्या सामन्यातही भारतावर विजय; काढला वचपा

India VS New Zealand 3rd ODI Winner : न्यूझीलंडचा तिसऱ्या सामन्यातही भारतावर विजय; काढला वचपा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्वेन्टी-२० मालिकेतील सव्याज वचपा न्यूझीलंडने वनडे मालिकेत काढल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभूत करत ही मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली. न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

भारताच्या २९८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिल आणि हेनरी निकोल्स यांनी १०२ धावांची सलामी दिली. गप्तिलने यावेळी ४६ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. निकोल्सने ९ चौकारांच्या जोरावर ८० धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र न्यूझीलंडची सामन्यावरची पकड ढिली झाली. कारण मधल्या फळीतील केन विल्यमसन आणि फॉर्मात असलेल्या रॉस टेलर हे दोघेही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले. पण त्यानंतर कॉलिन ग्रँडहोमने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Image result for guptil and nicols

तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या. श्रेयसपाठोपाठ लोकेशनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.  केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह शतकी भागीदारी केली. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला. मनीष पांडेही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानं 42 धावा केल्या. भारतानं 50 षटकांत 7 बाद 296 धावा केल्या.

मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आलं. मयांक अग्रवाल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतेल, तर पृथ्वी शॉला मोठी खेळी करता आली नाही. पण, लोकेश राहुलनं सातत्यपूर्ण खेळ करताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. लोकेशनं वैयक्तिक शतकी खेळीसह श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

Image

तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली. 

श्रेयसनं मालिकेतील फॉर्म कायम राखताना सलग तिसऱ्यांदा 50+ खेळी केली. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन वन डे सामन्यांत 50+ खेळी करणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं अशी कामगिरी Imageकेली होती. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या. श्रेयसपाठोपाठ लोकेशनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 

 

केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह शतकी भागीदारी केली. भारतानं 40 षटकांत दोनशेचा पल्ला गाठून पाचची सरासरी कायम राखली होती. लोकेश राहुलनं शतक पूर्ण करताना आगळ्या वेगळ्या पंक्तीत स्थान पटकावले. आशियाई देशांबाहेर पाचव्या क्रमांकावर शतक झळकावणारा लोकेश तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी युवराज सिंगन ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे आणि सुरेश रैनानं न्यूझीलंड व इंग्लंड येथे अशी कामगिरी केली आहे. 

वन डे क्रिकेटमधील हे त्याचे चौथे शतक ठरले. या शतकासह त्यानं विराट कोहलीचा विक्रम मोडला. सर्वात कमी डावांमध्ये चार वन डे शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांत लोकेशनं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं 31 डावांमध्ये हा पराक्रम केला. शिखर धवन ( 24 डाव ) अव्वल स्थानी आहे. कोहलीला चार शतकं झळकावण्यासाठी 36 डाव खेळावे लागले होते. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला. मनीष पांडेही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानं 42 धावा केल्या. भारतानं 50 षटकांत 7 बाद 296 धावा केल्या.

Web Title: NZvsIND, 3rd ODI: New Zealand win over India 3rd odi match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.