Join us

NZvsIND, 3rd ODI : जसप्रीत Bumrah ला चाहत्यांनी बनवले न्यूझीलंडचा फलंदाज, पण का...

आता तर चाहत्यांनी बुमराहला थेट न्यूझीलंडचा फलंदाजी करून टाकलं आहे, पण चाहत्यांनी नेमकं असं केलं तरी का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:35 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात महत्वाचा वेगवान गोलंदाज समजला जातो. काही जणांनी तर बुमराहला जगातील अव्वल गोलंदाज, अशी बिरुदावलीही दिली होती. पण आता तर चाहत्यांनी बुमराहला थेट न्यूझीलंडचा फलंदाजी करून टाकलं आहे, पण चाहत्यांनी नेमकं असं केलं तरी का...

भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला ट्रोल करायला सुरुवात केली होती. न्यूझीलंडविरुदधच्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेत शार्दुलने भरपूर धावा दिल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलने पहिल्या वनडे सामन्यात ९ षटकांतमध्ये ८० धावा दिल्या. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शार्दुलने १० षटकांत ६० धावा दिल्या होत्या. आज झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात तर शार्दुलने ९.१ षटकांत ८७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले.

चाहत्यांनी शार्दुलबरोबर आता तर बुमराहलादेखील ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बुमराह हा भारताचा गोलंदाज नसून न्यूझीलंडचा फलंदाज आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण न्यूझीलंडविरुदधच्या तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहला एकही बळी मिळवता आलेला नाही.

बुमराहने तीन वनडे सामन्यांत ३० षटके टाकली. या ३० षटकांमध्ये त्याने एक षटक निर्धावही टाकले. पण या ३० षटकांमध्ये बुमराहने १६७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहने न्यूझीलंडला एक फलंदाज म्हणून मदत केली, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :जसप्रित बुमराहशार्दुल ठाकूरभारत विरुद्ध न्यूझीलंड