Join us

NZvIND : न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश टाळण्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारताला रोहितची उणीव भासली. रोहितने गेल्या १२ महिन्यांत वन-डे क्रिकेटमध्ये ५७.३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत धावा फटकावण्याची जबाबदारी पूर्णपणे कोहलीवर आली. त्याने दोन सामन्यांत ६६ धावा केल्या. भारताने टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवला होता, पण वन-डेमध्ये परिस्थिती एकदम विपरीत झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 20:38 IST

Open in App

माऊंट मोनगानुई : भारतीय संघ मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध तिस व अखेरच्या वन-डे सामन्यात ‘व्हाईटवॉश’ टाळण्यासाठी प्रयत्नशील राहील. दुखापतग्रस्त असल्यामुळे नियमित कर्णधार केन विलियम्सनविना खेळल्यानंतरही यजमान संघाने टी-२० मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरून पहिल्या दोन वन-डेमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली. विलियम्सन फिटनेस चाचणीत यशस्वी ठरला तर तो अखेरच्या लढतीत खेळेल.आघाडीच्या फळीची कामगिरी उभय संघांदरम्यान फरक स्पष्ट करणारी ठरली. रोहित शर्मा व शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर आहेत तर विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. फॉर्मात असलेला के.एल. राहुल फलंदाजी क्रमामध्ये खालच्या फळीत येत आहे. आघाडीची फळी भारतीय संघाची ताकद होती, पण या मालिकेत ही फळी स्पपशेल अपयशी ठरली. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ व मयंक अग्रवाल यांनी टप्प्याटप्प्याने चांगली कामगिरी केली, पण भारताला अपेक्षित सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले.

भारताला रोहितची उणीव भासली. रोहितने गेल्या १२ महिन्यांत वन-डे क्रिकेटमध्ये ५७.३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत धावा फटकावण्याची जबाबदारी पूर्णपणे कोहलीवर आली. त्याने दोन सामन्यांत ६६ धावा केल्या. भारताने टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवला होता, पण वन-डेमध्ये परिस्थिती एकदम विपरीत झाली. गेल्यावेळी २०१९ मध्ये भारतीय संघाने येथे वन-डे मालिका ४-१ ने जिंकली होती, पण टी-२० मालिका २-१ ने गमावली होती. यापूर्वी भारतीय संघ येथे २०१४ मध्ये वन-डे मालिकेत ४-१ ने पराभूत झाला होता.श्रेयस अय्यरने एक शतक व एक अर्धशतक झळकावले, पण रॉस टेलरने दोन्ही सामन्यांत भारतीय संघावर वर्चस्व गाजवले. अय्यरला ‘फिनिशर’ची भूमिका बजावता आली नाही, टेलरने मात्र ही जबाबदारी योग्यप्रकारे बजावली.

राहुल, शॉ, अय्यर, केदार जाधव व यजुवेंद्र चहल यांचा सोमवारी एच्छिक सराव सत्रात सहभाग नव्हता. कोहली सर्वप्रथम सरावासाठी आला. त्याने वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजीचा सराव केला. मनीष पांडे त्यानंतर फलंदाजीच्या सरावासाठी नेट््समध्ये दाखल झाला तर रिषभ पंतने प्रदीर्घ वेळ सराव केला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळला नाही. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य सर्व गोलंदाजांनी सराव केला.

न्यूझीलंडने लेग स्पिनर ईश सोढी व वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनेर यांचा संघात समावेश केला आहे. सोढीने कोहलीला हॅमिल्टनमध्ये गुगलीवर बाद केले होते. सोढी व टिकनेर न्यूझीलंड ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करीत होते. भारत ‘अ’विरुद्ध लिंकनमध्ये अनिर्णीत संपलेल्या दुसºया अनधिकृत कसोटी सामन्यात त्यांचा सहभाग होता, पण ते चौथ्या व अखेरच्या दिवशी खेळात सहभागी झाले नाहीत. न्यूझीलंड संघातील टीम साऊदी व मिशेल सँटनेर पोटदुखीमुळे त्रस्त आहेत तर स्कॉट कुग्लेनला ज्वर आला आहे.

प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी.न्यूजीलंड :- टॉम लॅथम (कर्णधार व विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, कालिन डी ग्रँडहोम, जिमी नीशम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढी, टीम साउदी, काइल जेमीसन, मार्क चॅपमेन.सामना : भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी ७.३० पासून.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड