Join us

NZvIND : विराट कोहलीला झटपट आऊट करायचं कसं; न्यूझीलंडच्या गोलंदाजाने सांगितला खास फॉर्म्युला

या दौऱ्यात आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीने फक्त एकच अर्धशतक झळकावलेले आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोहलीला अजूनही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:00 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. भारताने ही वनडे मालिका गमावली आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली जास्त धावा करू शकला नाही. त्याला झटपट बाद करण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. आता कोहलीला झटपट कसं आऊट करायचं, याचा फॉर्म्युला न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने सांगितला आहे.

आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीने फक्त एकच अर्धशतक झळकावलेले आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोहलीला अजूनही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे कोहलीला आतापर्यंत या दौऱ्यात एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कोहलीच्या फलंदाजीची नस ओळखली, असे म्हटले जात आहे. त्यामध्येच न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने तर कोहलीला झटपट बाद करण्याचे रहस्यही सांगितले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी औपचारीक आहे, तर टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे. पण, यंदाच्या वर्षात वन डे क्रिकेट हे लक्ष्य नसल्याचे कोहलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आहे आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 आणि कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात टीम इंडिया काही प्रयोग करू शकते. आगामी कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कर्णधार विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो.

कोहलीबाबत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी म्हणाला की, " कोहली हा एक दर्जेदार फलंदाज आहे. त्याला बाद करणं ही सोपी गोष्ट नाही. पण जर तुम्ही नवीन चेंडूचा चांगला वापर केला आणि चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य ठेवलात तर तुम्ही कोहलीला बाद करू शकता. पण त्यासाठी खेळपट्टीची मदत मिळणेही महत्वाचे ठरते." 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड