NZ vs PAK : भारतात आयपीएलचा माहोल असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ अशा पराभवाची नामुष्की ओढावलेल्या पाकिस्तान संघाची वनडेतही पराभवाने सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या नेपियर मॅकलीन पार्कच्या मैदानात रंगलेला सामना जिंकत न्यूझीलंडच्या संघानं ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या मुहम्मद अब्बास (Muhammad Abbas) याने आपल्या स्फोटक फलंदाजीसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. त्याने भारतीय क्रिकेटचा विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् भारतीय खेळाडूनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
न्यूझीलंडच्या ताफ्यातील २१ वर्षीय क्रिकेटर मुहम्मद अब्बास (Muhammad Abbas) याने पदार्पणाच्या सामना खेळताना अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. वनडे पदार्पणातील जलद अर्धशतकाचा विक्रम आता या पाक वंशाच्या न्यूझीलंड क्रिकेटरच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम भारतीय क्रिकेट क्रुणाल पांड्याच्या नावे होता. त्याने इंग्लंड विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात २६ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला...
२६ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी
मुहम्मद अब्बास हा पाकिस्तानी वंशीय क्रिकेटर अजहर अब्बास याचा मुलगा आहे. अजहर अब्बास पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना दिसले आहे. मूळचा लाहोरचा असणारा हा क्रिकेटर काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडला शिफ्ट झाला. त्याचा मुलगा मोह्मद अब्बास याने क्रिकेटचे धडे न्यूझीलंडमध्येच गिरवले. आता त्याने वयाच्या २१ व्या वर्षी राष्ट्रीय संघाकडून दमदार पदार्पण केल्याचे दिसते. पाकिस्तान विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात या युवा क्रिकेटरनं २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली.
वनडे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे क्रिकेटर
- २४- मुहम्मद अब्बास, न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (२०२५)
- २६- क्रुणाल पांड्या, भारत विरुद्ध इंग्लंड (२०२१)
- २६- एलिक अथानाजे, वेस्टइंडिज विरुद्ध यूएई (२०२३)
- ३३- इशान किशन, भारत विरुद्ध श्रीलंका (२०२१)
- ३५- जॉन मॉरिस, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (१९९१)