Join us

NZ vs IND : पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळे व्यत्यय, भारत ५५ षटकातं ५ बाद १२२

भारताला दुसऱ्या सत्राअखेरीस ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारता आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 09:18 IST

Open in App

वेलिंग्टन - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही.

पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या सत्रातही भारताला दोन फलंदाज गमवावे लागले. पण मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मात्र भारताच डाव सावरला.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात २८ षटकांत ३ बाद ७९ अशी मजल मारली होती. दुसऱ्या सत्रातील सातव्या षटकातच भारताला सलामीवीर मयांक अगरवालच्या रुपात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हनुमा विहारीलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताला दुसऱ्या सत्राअखेरीस ५५ षटकांत ५ बाद १२२ अशी मजल मारता आली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड