NZ vs IND: भारताविरुद्ध न्यूझीलंडने केला कसोटी संघ जाहीर; 'या' तगड्या गोलंदाजाचे पुनरागमन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 12:15 IST2020-02-17T12:14:00+5:302020-02-17T12:15:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
NZ vs IND: New Zealand announces Test squad against India | NZ vs IND: भारताविरुद्ध न्यूझीलंडने केला कसोटी संघ जाहीर; 'या' तगड्या गोलंदाजाचे पुनरागमन

NZ vs IND: भारताविरुद्ध न्यूझीलंडने केला कसोटी संघ जाहीर; 'या' तगड्या गोलंदाजाचे पुनरागमन

वेलिंग्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यातच आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने पुनरागमन केले आहे. तसेच न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज कायल जेमिन्सनला संधी दिली असून फिरकीपटू मिशेल सॅन्टनरला संघातून वगळण्यात आले आहे. 

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातला सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियानं गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले. पहिल्या डावातील 28 धावांच्या आघाडीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवशी 4 बाद 252 धावा करताना सामना अनिर्णित राखला आहे.

भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

न्यूझीलंडचा कसोटी संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग,नील वॅग्नर

Web Title: NZ vs IND: New Zealand announces Test squad against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.