Join us

NZ vs IND, 1st Test: चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागेल - अश्विन

अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांच्याकडून भारताला अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:37 IST

Open in App

वेलिंग्टन : ‘सध्या यजमानांना लक्ष्य देण्याचा सध्याचा विचार करीत नसून त्यासाठी अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांना फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी करावी लागेल,’ असे मत भारताचा अनुभवी आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने म्हटले.अश्विन म्हणाला, ‘खेळपट्टी पहिल्या दिवसासारखी नसली, तरी दुसऱ्या डावात न्यूझीलंडचे गोलंदाज चांगला मारा करीत आहेत. त्यांनी आमच्यापुढे अडचणी निर्माण केल्या असून आमच्यासाठी कसोटी सामना आता सुरू झालेला आहे. त्यांनी ६५ षटके गोलंदाजी केली आणि ते सोमवारी कशी गोलंदाजी करतात हे बघावे लागेल. कारण सकाळी व आणखी एक सत्र फलंदाजी करावी लागेल.’चौथ्या डावात किती धावांच्या लक्ष्याचा बचाव करता येईल, याबाबत अश्विन म्हणाला, ‘कुठले लक्ष्य गाठता येईल, कुठले नाही, याचे उत्तर देता येणार नाही. अद्याप सहा सत्रांचा खेळ शिल्लक आहे.’ न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. किमान एवढी धावसंख्या उभारली तर भारताला संधी मिळू शकते. याबाबत अश्विन म्हणाला, ‘अद्याप यापासून आम्ही बरेच दूर आहोत. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्हाला प्रत्येक चेंडू खेळावा लागेल. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असून आम्हाला प्रत्येक सत्र व तासाचा विचार करीत खेळावे लागेल. कितीही छोटे लक्ष्य असले तरी आमच्यासाठी चांगले राहील. रहाणे व विहारी यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांचा जम बसला असून खेळपट्टी कशी आहे, याची त्यांना कल्पना आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडआर अश्विन