Join us  

NZ vs AUS : 2,6,6,6,0,6 : विराट कोहलीच्या माजी खेळाडूनं १५ कोटींच्या नव्या भिडूला धु धु धुतले, नोंदवला रेकॉर्ड, Video

Aaron Finch becomes the first batsman from australia to hit 100 sixes in T20I प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं ६ बाद १५६ धावा केल्या

By स्वदेश घाणेकर | Published: March 05, 2021 2:12 PM

Open in App

NZ vs AUS, 4th T20I : आयपीएल लिलावात ( IPL 2021 Auction) न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं १५ कोटी मोजले, त्यापासून तो चर्चेत राहिला आहे. त्याच्यासाठी एवढी रक्कम मोजूनही त्याची कामगिरी अत्यंत निराशाजन झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराट कोहली ( Virat Kohli) आणि RCB सातत्यानं ट्रोल होत आहे. त्यात RCBनं IPL 2021च्या तोंडावर रिलीज केलेल्या अॅरोन फिंचनं ( Aaron Finch) सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावून ट्रोलर्सना आणखी एक संधी दिली. फिंचनं न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्याच्या अखेरच्या षटकात जेमिन्सनला चार खणखणीत षटकार खेचून २६ धावा चोपल्या. IPL 2021 Dates : टीम इंडिया जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात खेळल्यास BCCIला घ्यावा लागेल मोठा निर्णय

प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं ६ बाद १५६ धावा केल्या. फिंचनं एकहाती खिंड लढवताना ५५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानं टोलावलेली चारही षटकार हे अखेरच्या षटकात आली. जेमिन्सननं ४ षटकांत ४९ धावा दिल्या आणि पुन्हा एकदा तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. 

कायले जेमिन्सनची मागील तीन ट्वेंटी-20तील कामगिरी१ बाद ३२ धावा४ षटकांत  ५६ धावा४ षटकांत ३८ धावा व ११ धावा

ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-20त १०० षटकार मारणारा पहिला फलंदाजअॅरोन फिंच ७० डाव व १०३ षटकारग्लेन मॅक्सवेल ६३ डाव ९३ षटकारडेव्हिड वॉर्नर ८१ डाव ९१ षटकार

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीआयपीएल लिलावन्यूझीलंडआॅस्ट्रेलियाअ‍ॅरॉन फिंच