Join us

आता भारतीय क्रिकेटपटूंचीही 'नाडा'कडून होणार डोपिंग टेस्ट

मुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना 'नाडा'चे सर्व नियम आणि अटी लागू होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 15:39 IST

Open in App

नवी दिल्ली : आतापर्यंत भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट झाल्याचे जास्त ऐकिवात येत नव्हते. कारण बीसीसीआय त्यांची डपिंग टेस्ट घ्यायची, पण आता राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट घेणार आहे.

यापूर्वी 'नाडा'ला बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या डोपिंग टेस्टची परावानगी दिली नव्हती. पण क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी आज बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकरात्मक चर्चा झाली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना 'नाडा'चे सर्व नियम आणि अटी लागू होतील.

टॅग्स :बीसीसीआय