आता ‘हंड्रेड’ स्पर्धा ठरेल महत्त्वाची

आता बुधवारी ईसीबीची आणखी एक बैठक होईल आणि यामध्ये प्रमुख अजेंड्यामध्ये ‘हंड्रेड’ स्पर्धेचा समावेश असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:03 IST2020-04-29T04:03:50+5:302020-04-29T04:03:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Now the 'Hundred' competition will be important | आता ‘हंड्रेड’ स्पर्धा ठरेल महत्त्वाची

आता ‘हंड्रेड’ स्पर्धा ठरेल महत्त्वाची

लंडन : ‘कोरोना विषाणूमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाकडे पाहता वादग्रस्त ठरलेल्या ‘हंड्रेड’ स्पर्धेचे आयोजन आता महत्त्वपूर्ण ठरत आहे,’ असे मत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे (ईसीबी) प्रमुख टॉम हॅरिसन यांनी मांडले.
गेल्याच आठवड्यात ईसीबीने आपल्या २०२० सत्राची सुरुवात १ जुलैपासून करण्याचा निर्णय घेतला. आता बुधवारी ईसीबीची आणखी एक बैठक होईल आणि यामध्ये प्रमुख अजेंड्यामध्ये ‘हंडेÑड’ स्पर्धेचा समावेश असेल. या स्पर्धेत प्रत्येक संघाला १०० चेंडू खेळण्याची संधी मिळेल. हे क्रिकेटचे नवे स्वरूप असून या स्वरूपावर याआधी जगभरातून मोठी टीका झाली होती. या स्पर्धेत इंग्लिश क्रिकेटच्या १८ प्रथम श्रेणी कौंटींऐवजी ८ फ्रेंचाईजी संघ सहभागी होतील. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सुधारल्यानंतर जुलैमध्ये ईसीबीद्वारे या स्पर्धेची सुरुवात होऊ शकते.
ईसीबीचे अधिकारी फार आधीपासून सांगत आले आहेत की, क्रिकेटचा हा नवा प्रकार प्रेक्षकांना अधिक चांगल्याप्रकारे जोडून ठेवेल आणि हा प्रकार क्रिकेटच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र आता कोरोना विषाणूमुळे लागलेल्या निर्बंधांमुळे या स्पर्धेच्या आयोजनास उशीर होत आहे. हॅरिसन यांनी सांगितले की, ‘या स्पर्धेच्या आयोजनासाठी सध्याच्या परिस्थितीचा कशा प्रकारे परिणाम होईल याकडे आम्ही लक्ष देऊ. क्रिकेटच्या प्रेक्षक संख्येत जास्तीत जास्त वाढ होण्याच्या उद्देशाने या प्रकाराची सुरुवात करण्यात येणार आहे.’ 

Web Title: Now the 'Hundred' competition will be important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.