Join us

आता लढाई कोर्टातच ; मोहम्मद शामीच्या वाटाघाटीच्या अपेक्षा मावळल्या

शामीने हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबियांना हसीनशी संवाद साधायला सांगितले होते. पण यामध्ये अजूनही यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे काही जाणकारांनुसार शामीने आता वकिलांशी संपर्क साधायचे ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 13:08 IST

Open in App
ठळक मुद्दे शामीने आपल्या वकिलांशी संपर्क साधला असून आता कोर्टामध्ये आपली बाजू कशी मांडायची याबाबत त्याने सल्लासमलत करायला सुरुवात केली आहे.

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या पत्नी हसीन जहाँबरोबरच्या वाटाघाटीच्या अपेक्षा मावळल्या आहेत. त्यामुळे शामीने आता कोर्टात जाण्याचा विचार पक्का केला आहे. शामीने आपल्या वकिलांशी संपर्क साधला असून आता कोर्टामध्ये आपली बाजू कशी मांडायची याबाबत त्याने सल्लासमलत करायला सुरुवात केली आहे.

हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे शामीने यापूर्वी म्हटले आहे. हे भांडण घरामध्ये सोडवायला हवे, असेही शामीने हसीनला सांगितले होते. पण हसीनने मात्र या गोष्टीला नकार दिला आहे. 

शामीने काही कुटुंबियांच्या मदतीने हसीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. हसीनने शामीची बोलायला नकार दिला होता. त्यानंतर शामीने हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबियांना हसीनशी संवाद साधायला सांगितले होते. पण यामध्ये अजूनही यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे काही जाणकारांनुसार शामीने आता वकिलांशी संपर्क साधायचे ठरवले आहे.

आतापर्यंत कोलकाता पोलिसांनी शामीला चौकशीसाठी बोलावलेले नाही. पण जर पोलिसांनी चैकशीला बोलावले तर त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे शामीने सांगितले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देणार असल्याचेही शामीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीन्यायालय