IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नव्हे! यावेळी 'हा' युवा स्फोटक बॅटर करेल हवा; माजी दिग्गजाची भविष्यवाणी

वैभव सूर्यवंशी नव्हे हा पठ्ठ्या गाजवणार यंदाचा हंगाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:14 IST2026-03-20T18:08:49+5:302026-03-20T18:14:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Not Vaibhav Suryavanshi Aakash Chopra Predicts Abhishek Sharma Have Breakout Season In IPL 2026 | IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नव्हे! यावेळी 'हा' युवा स्फोटक बॅटर करेल हवा; माजी दिग्गजाची भविष्यवाणी

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नव्हे! यावेळी 'हा' युवा स्फोटक बॅटर करेल हवा; माजी दिग्गजाची भविष्यवाणी

आयपीएल २०२६ स्पर्धेच्या १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी पुन्हा लक्षवेधी ठरेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. यासह अनेक अनुभवी खेळाडूंवरही क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.  यादरम्यान आकाश चोप्रा यांनी काव्या मारनच्या ताफ्यातील भिडूसंदर्भात मोठी  भविष्यवाणी केली आहे. भारताचा माजी क्रिकेटर, विद्यमान समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी नेमंक काय म्हटले? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वैभव सूर्यवंशी नव्हे हा पठ्ठ्या गाजवणार यंदाचा हंगाम!

वैभव सूर्यवंशीची चर्चा रंगत असताना आकाश चोप्रा यांनी सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर आणि  उप कर्णधार अभिषेक शर्मा यंदाचा हंगाम गाजवेल, असे म्हटले आहे.आंतरारष्ट्रीय टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेला अभिषेक शर्मा आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ हंगाम खेळला आहे. पण एकदाही त्याला ५०० धावांचा पल्ला  गाठता आलेला नाही. २०२४ च्या हंगामात त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना २०४ च्या स्ट्राईक रेटनं ४८४ धावा काढल्या होत्या.

IPL 2026: राजस्थान रॉयल्सची मोठी डील फसली! संजूचा रिप्लेसमेंट यंदाच्या हंगामातून OUT?

आकाश चोप्रा यांनी नेमकं काय म्हटलंय?

IPL 2026 च्या हंगामाआधी आकाश चोप्रा यांनी यंदाच्या हंगामातील अन्य स्फोटक बॅटरच्या तुलनेत अभिषेक शर्मा भारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा आणि नेहाल वढेरासह अन्य बॅटरच्या तुलनेत तो सर्वोत्तम ठरेल असे आकाश चोप्रांनी म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सवरील खास कार्यक्रमात ते म्हणाले की, "आतापर्यंत त्याची कामगिरी ‘शानदार’ म्हणू अशी नाही. पण यंदाचा हंगाम त्याच्यासाठी खास ठरेल."

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फायनलमध्ये धमाका

पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना अभिषेक शर्मा सपशेल अपयशी ठरला. सलग तीन वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर यंदाच्या  पदार्पणाच्या टी-२० वर्ल कप स्पर्धेच्या हंगामात ओढावली. तो धावांसाठी संघर्ष करत असताना टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर भरवसा दाखवला. फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी अर्धशतक झळकावत त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याची ही खेळी SRH च्या संघालाही मोठा दिलासा देणारी अशीच होती.

Web Title : वैभव नहीं, अभिषेक शर्मा IPL 2026 में मचाएंगे धमाल: भविष्यवाणी

Web Summary : आकाश चोपड़ा के अनुसार, अभिषेक शर्मा आईपीएल 2026 में अन्य विस्फोटक बल्लेबाजों से बेहतर प्रदर्शन करेंगे। पिछली अस्थिरता के बावजूद, चोपड़ा मानते हैं कि टी20 विश्व कप के फाइनल में उनके प्रभावशाली प्रदर्शन के बाद यह सीजन शर्मा के लिए महत्वपूर्ण होगा।

Web Title : Abhishek Sharma tipped to shine in IPL 2026, not Vaibhav!

Web Summary : Abhishek Sharma is predicted to excel in IPL 2026, surpassing other explosive batters. Despite past inconsistencies, cricket analyst Aakash Chopra believes this season will be pivotal for Sharma, especially after his impactful performance in the T20 World Cup final.