Ind vs Eng: "संजू सॅमसन नाही, तर 'हा' खेळाडू इंग्लंडला पडणार भारी!" ग्लेन मॅकग्राने दिली वॉर्निंग

India vs England Semi Final: भारत आणि इंग्लंड यांच्यात २० विश्वचषकाचा दुसरा मोठा उपांत्य सामना ५ मार्चला मुंबईत रंगणार आहे, या महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने इंग्लंडच्या संघाला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:43 IST2026-03-04T12:39:31+5:302026-03-04T12:43:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
"not Sanju Samson, But Jasprit Bumrah will be big blow to England!" Glenn McGrath warns | Ind vs Eng: "संजू सॅमसन नाही, तर 'हा' खेळाडू इंग्लंडला पडणार भारी!" ग्लेन मॅकग्राने दिली वॉर्निंग

Ind vs Eng: "संजू सॅमसन नाही, तर 'हा' खेळाडू इंग्लंडला पडणार भारी!" ग्लेन मॅकग्राने दिली वॉर्निंग

टी-२० विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने एक मोठे भाकीत केले आहे. इंग्लंडने संजू सॅमसन किंवा इतर फलंदाजांपेक्षा जसप्रीत बुमराहपासून अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे मॅकग्राने म्हटले आहे.

चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मॅकग्राने बुमराहचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, "मला वाटते की जसप्रीत बुमराह हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. अनेकदा मोठे खेळाडू दबावाच्या प्रसंगी डगमगतात, पण बुमराहला आव्हाने आवडतात. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा बुमराह स्वतःला सिद्ध करतो. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात तो एकट्याच्या जोरावर सामना फिरवू शकतो, असा मला पूर्ण विश्वास आहे."

मॅकग्राने पुढे म्हटले की, "मोठ्या संघांना दबावात खेळायला आवडते. मी ज्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होतो, तेव्हा आम्हाला फक्त अंतिम फेरी गाठण्याची भीती वाटायची. एकदा का आम्ही तिथे पोहोचलो, की समोरचा संघ संपला असे आम्ही समजायचो. भारतीय संघही आता त्याच मानसिकतेत असून ते आव्हानांसाठी सज्ज झाला आहे."

जसप्रीत बुमराहला मुंबईत खेळण्याचा दांडगा अनुभव आहे, ज्याचा फायदा भारताला या सामन्यात नक्कीच होईल. बुमराहची इंग्लंडविरुद्धची आकडेवारीही धडकी भरवणारी आहे. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या संपूर्ण टी-२० आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत एकूण ११६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह नमकी कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title : संजू नहीं, 'ये' खिलाड़ी इंग्लैंड पर पड़ेंगे भारी: मैक्ग्रा की चेतावनी!

Web Summary : ग्लेन मैक्ग्रा ने सेमीफाइनल में जसप्रीत बुमराह से सावधान रहने की चेतावनी दी है। मैक्ग्रा ने दबाव में प्रदर्शन करने की बुमराह की क्षमता और मुंबई में उनके अनुभव की प्रशंसा की, इंग्लैंड के खिलाफ उनके प्रभावशाली टी20I रिकॉर्ड पर प्रकाश डाला।

Web Title : Not Samson, this player will trouble England: McGrath warns!

Web Summary : Glenn McGrath warns England to be wary of Jasprit Bumrah in the semi-final. McGrath praised Bumrah's ability to perform under pressure and his experience in Mumbai, highlighting his impressive T20I record against England.