Join us  

फक्त मनिष पांडेवरच नाही यापूर्वी पाच वेळा असाच भडकला होता धोनी

धोनीचा तो रुद्रवतार अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण क्रिकेट करीयरमध्ये धोनी पहिल्यांदाच असा भडकलेला नाही. यापूर्वी सुद्धा काही सामन्यांमध्ये धोनींचे मैदानावरच नियंत्रण सुटले होते.            

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 11:44 AM

Open in App
ठळक मुद्दे2015 साली तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. भारताने टी-20 चा सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने धोनीला स्लो रन रेटबद्दल प्रश्न विचारला.

नवी दिल्ली - भारताची माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी शांत, संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कुल म्हणतात. पण बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात धाव घेत असताना धोनी मनिष पांडेवर प्रचंड भडकला. धोनीने चक्क मैदानावर मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरले. धोनीचा तो रुद्रवतार अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण क्रिकेट करीयरमध्ये धोनी पहिल्यांदाच असा भडकलेला नाही. यापूर्वी सुद्धा काही सामन्यांमध्ये धोनींचे मैदानावरच नियंत्रण सुटले होते.            

-   2015 साली तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 309 धावांचे टार्गेट मिळाले होते. 25 व्या षटकात  मुश्ताफीर रहमानच्या गोलंदाजीवर चेंडू तटवून धोनी धाव घेण्यासाठी पळाला. त्यावेळी धोनीचा मार्ग रोखण्यासाठी रहमान खेळपट्टीच्या मधोमध येऊन थांबला. रहमानच्या त्या वर्तनाचा धोनीला इतका संताप आला कि, त्याने रहमानला हाताचा कोपरा मारुन ढकलून दिले. या वर्तनासाठी सामनाधिकाऱ्यांनी धोनीच्या सामन्याच्या मानधनातून 75 टक्के तर मुश्ताफीरच्या मानधनातून 50 टक्के कापून घेण्याचा निर्णय घेतला.          

                                     

- 2012 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका वनडे सामन्यात धोनीचा पारा चढला होता. सुरेश रैना 29 वे  षटक टाकत असताना त्याच्या गोलंदाजीवर धोनीने माइक हसीला यष्टीचीत केले. तिसऱ्या पंचांनी हसीला बाद घोषित केले. स्वत: हसी सुद्धा निर्णय मान्य करुन मैदानाबाहेर जात होता. त्यावेळी मैदानावरील पंचांनी हसीला थांबवले व परत बोलावले. ते पाहून धोनी प्रचंड संतापला व त्याने पंचांशी वाद घातला.  

                                    

-  2016 साली भारत-बांगलादेश दौऱ्यात भारताने टी-20 चा सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने धोनीला स्लो रन रेटबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर धोनी संतापला व समोरच्या पत्रकाराला त्याने भारताच्या विजयाने तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही असा प्रतिप्रश्न केला. 

-   2011साली श्रीलंके विरुद्धच्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनीने 91 धावांची महत्वाची खेळी केली होती. या सामन्यात एका टप्प्यावर भारताला विजयासाठी 21 चेंडूत 21 धावांची आवश्यकता होती. नुआन कुलसेकरा गोलंदाजी करत असताना धोनीला एक धाव घ्यायची होती. पण नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या युवराज सिंगने नकार दिला. त्यावर धोनी प्रचंड संतापला व युवराजला त्याने सुनावले. 

-  इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात यझुवेंद्र चहलने धावबाद करण्याची संधी सोडली. खरंतर चहलने जिथे धावबाद करायची सोपी संधी होती ती सोडून धोनीच्या दिशेने धावबाद करण्यासाठी चेंडू फकेला. यामध्ये विकेट मिळाला नाही. त्यावेळी सुद्धा धोनीने चहलला खडेबोल सुनावले होते.                                       

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८