Join us  

अंबानींची मुंबई इंडियन्स 'महागुरू' सचिन तेंडुलकरला किती पैसे देते माहीत आहे का?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:23 AM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. सल्लागार समितीच्या सदसत्वासह हे तिघेही इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) विविध संघांच्या सल्लागारपदीही आहेत. त्यामुळेच बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी या तिघांनाही परस्पर हितसंबंध जपल्या प्रकरणी नोटीस पाठवली होती. त्यावर महान फलंदाज तेंडुलकरने उत्तर पाठवले. त्यात त्याने आपला मुंबई इंडियन्स संघाच्या निवड प्रक्रियेत सहभाग नसल्याचे स्पष्ट केला. पण, त्याचवेळी त्याच्या आणखी एका उत्तरानं क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्याबाबत तक्रार केली होती. यामध्ये त्यांनी तेंडुलकर आणि लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये आहेत, त्याचबरोबर ते आयपीएलच्या संघाचाही एक भाग आहेत. त्यामुळे परस्पर हितसंबंध जपले जात असल्याची भूमिका गुप्ता यांनी मांडली होती. त्यानुसार बीसीसीआयचे लोकपालांनी तेंडुलकर व लक्ष्मणला नोटीस पाठवली होती. जैन यांनी तेंडुलकर व लक्ष्मण यांच्याकडून 28  एप्रिलपर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले होते, बीसीसीआयकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, सचिन व लक्ष्मण यांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपली बाजू मांडली नाही, तर त्यांना त्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, असेही लोकपालांनी स्पष्ट केले होते.  

या नोटीशीला तेंडुलकरने उत्तर पाठवले आहे. आपल्या उत्तरामध्ये त्याने म्हटले आहे की, " आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाकडून मला कोणताही लाभ मिळत नाही. त्याचबरोबर संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नसतो. त्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपला जात नाही." आयपीएलमधील सर्वात श्रीमंत संघांमध्ये आघाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सकडून तेंडुलकरला एक रुपयाही मिळत नसल्याचे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सचिन मुंबई इंडियन्सचा, तर लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादचा मेंटर आहे. विशेष म्हणजे परस्पर हितसंबंध जपल्याबद्दलचे यंदाचे हे तिसरे प्रकरण समोर आले आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तो बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष, सीएसी सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा तीन भूमिकेत होता. यासाठी गांगुलीला निवृत्त न्यायाधिश जैन यांच्यापुढे सनावणीसाठी उपस्थित रहावे लागले होते.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआयपीएल 2019मुंबई इंडियन्स