लंडन : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद विश्वकप स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे चिंतेत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत त्याला संघाकडून चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.
पाकिस्तानने आतापर्यंत पाचपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे, पण भारताविरुद्ध ८९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले.
सरफराज म्हणाला, विश्वकप स्पर्धेत भारताविरुद्धचा हा काही पहिलाच पराभव नाही. स्पर्धेत असे घडतच असते. भारताविरुद्धच्या पराभवानंतर मानसिकदृष्ट्या पाकिस्तानच्या कर्णधारवर दडपण येते. चाहत्यांना वाटते की आम्ही पराभूत झालो, पण विश्वकप स्पर्धेत हे प्रथमच घडलेले नाही. हे असे घडतच असते. आम्ही स्पर्धेत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.’
भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर एक आठवड्याने पाकिस्तान संघ लढत खेळणार
आहे.