Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी नाही तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू माझा गुरु, हार्दिक पंड्याने तोडले तारे

पंड्या हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना संघात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:03 IST

Open in App

सिडनी : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पूर्णपणे फिट झाला आहे. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये सहभागी होणार आहे. संघात दाखल झाल्यावर पंड्याने अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आहे. पंड्या हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना संघात आला. त्याच्याकडून बरेच काही शिकला. पण आता धोनी माझा गुरु नसून ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू असल्याचे त्याने सांगितले आहे.

पंड्याला आशिया चषक स्पर्धा सुरु असताना दुखापत झाली होती. त्यानंतर आतापर्यंत तो भारतीय संघात परतलेला नाही. ऑस्ट्रेलियाचाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेला त्याला मुकावे लागले होते. त्यानंतर पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही तो संघाबाहेर होता. दुखापतीतून सावरल्यावर पंड्याने फिटनेसवर भर दिला आणि आता तो संघात दाखल झाला आहे.

याबाबत पंड्या म्हणाला की, " धोनी कर्णधार असताना मी भारतीय संघात आलो. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळताना मी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. " 

टॅग्स :हार्दिक पांड्यामहेंद्रसिंह धोनी