Join us  

‘कुणालाही बाहेर केले नाही, केवळ संधीचा लाभ घेतला’

‘मी कुणालाही बाहेर करून संघात स्थान मिळविलेले नाही, तर केवळ मिळालेल्या संधीचा लाभ घेत संघात कायम आहे.’ असे भारतीय संघाचा युवा डावखुरा ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादव याने सोमवारी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:13 AM

Open in App

नागपूर : ‘मी कुणालाही बाहेर करून संघात स्थान मिळविलेले नाही, तर केवळ मिळालेल्या संधीचा लाभ घेत संघात कायम आहे.’ असे भारतीय संघाचा युवा डावखुरा ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादव याने सोमवारी सांगितले.कुलदीप व चहल हे अनेक एकदिवसीय सामन्यात नियमितपणे खेळत असून अश्विनला संधी मिळेनाशी झाली, तर जडेजा तिसरा नियमित फिरकीपटू बनला. ‘तुझ्या आणि युझवेंद्र चहलच्या कामगिरीमुळे एकदिवसीय संघातून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची गच्छंती झाली का,’ असा प्रश्न कुलदीपला विचारण्यात आला होता.यावर तो म्हणाला, ‘आम्ही कुणालाही बाहेर केले नाही, उलट मिळालेल्या संधीचे सोने केले. जडेजा व अश्विनकडून बरेच शिकायला मिळाले. दोघेही अनुभवी आहेत. मला संधी मिळाली. त्यात मी यशस्वी ठरलो. विविधतेने चेंडू टाकून विजय मिळवून देऊ शकलो याचा आनंद आहे.’ सामन्यागणिक गोलंदाजीत विविधता आणत असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘कुठल्याही फलंदाजांना चेंडू टाकताना दडपण नसते. माझा मारा चुकविण्याची काही फलंदाजांमध्ये निश्चितच क्षमता आहे. दुसरीकडे माझ्याविरुद्ध कुणी मोठी फटकेबाजी करेल, याची मुळीच भीती बाळगत नाही.’ शॉन मार्श माझे चेंडू चांगल्या तºहेने खेळतो, असा कुलदीपने आवर्जून उल्लेखही केला.>फलंदाजीवर लक्ष देतो‘अखेरच्या काही चेंडूवर सामना जिंकून देण्याची जबाबदारी अनेकदा गोलंदाजांवर येते. अशावेळी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनात फलंदाजी सुधारण्यावर लक्ष देत आहे. तिन्ही प्रकारात फलंदाजी महत्त्वाची आहेच. सरावात २० मिनिटे फलंदाजी करतो,’ असेही कुलदीप म्हणाला.

टॅग्स :कुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघ