Join us  

Virat Kohli : विराट कोहली कोरोनाविरुद्धच्या लढ्यात युवा सेनेसह उतरला मैदानावर; IPL 2021 स्थगितीनंतर लागला कामाला

Virat Kohli विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिका यांच्यासह बुधवारी घरी परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:11 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Bangalore) संघ चांगल्या फॉर्मात खेळताना दिसला. पण, कोरोना संकटामुळे आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला अन् सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिका यांच्यासह बुधवारी घरी परतला. आयपीएल स्थगित झाल्यानंतर विराटनं आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत विराटनं कोरोन व्हायरस विरोधातील लढ्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

मुंबईत कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी विराटनं पुढाकार घेतल आहे. विराटनं याआधीही गतवर्षी कोरोना लढ्यात पत्नी अनुष्का शर्मासह आर्थिक मदत केली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराटनं युवा सेनेसोबत या लढाईत मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेनेचा कोर कमिटी सदस्य ( Core - committee Member ) राहुल एन कनाल याच्यासोबत विराटनं चर्चा केली आणि रणनिती ठरवली. या भेटीचे फोटो राहुल कनालनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कनालनं लिहिलं की,''आज आपल्या कर्णधाराची भेट घेतली. कोरोनाविरुद्ध त्यानं जे युद्ध छेडले आहे, ते पाहून त्याच्या प्रतीचा आदर आणखी वाढला. त्याच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच प्रार्थना करतो.''   मुंबई इंडियन्सचा नाद खुळा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी, अन्य फ्रँचायझींनाही मदतीची तयारी!

आयपीएलमधूनही फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान... 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ आयपीएलच्या प्रत्येक पर्वात एका सामन्यात हिरव्या जर्सीत मैदानावर उतरतो. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सामाजिक संदेश RCBया सामन्यातून देतो. पण, यंदाच्या पर्वात विराट कोहलीचा संघ हिरव्या नाही तर निळ्या जर्सीत एक सामना खेळताना दिसणार होते. या निळ्या जर्सीतून RCBचा संघ कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार होते आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही ते देणार होते.

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीकोरोना वायरस बातम्या