Join us  

T20 World Cup 2024 साठी इरफान पठाणने निवडला Team India चा १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं!

Irfan Pathan Team India Squad, T20 World Cup 2024: संघात विराट सलामीवीर नाही, विकेटकिपरबद्दलही धाडसी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:53 PM

Open in App

Irfan Pathan selected Team India Squad for T20 World Cup 2024:  सध्या भारतात IPLची धामधूम सुरु आहे. सर्वच संघ दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंही आपली प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचे काही जुने तर काही नवखे खेळाडू टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी सांगताना दिसत आहेत. IPL 2024 ही स्पर्धा T20 World Cup 2024 साठी रंगीत तालीम मानली जाते. जून महिन्यात वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाईल. तत्पूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने त्याचा पसंतीचा १५ जणांचा संघ निवडला आहे. पाहूया त्याच्या संघाचा कोणाला स्थान मिळाले आणि कोणाला वगळण्यात आले आहे. 

इरफानने आपल्या संघात काही अपेक्षित नावे कायम ठेवली आहेत. तर काही नावांना वगळण्याचेही धाडस दाखवले आहे. इरफानच्या मते, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामी जोडी असावी. पर्याय म्हणून शुबमन गिल यालाही त्याने संघात स्थान दिले आहे. त्यानंतर मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग यांची निवड केली आहे. यष्टीरक्षाकाच्या जागेसाठी सध्या टीम इंडियात चुरस पाहायला मिळत आहे. इरफानने मात्र या जागेसाठी रिषभ पंतला पसंती दर्शवली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या जागेसाठी त्याने हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा या तिघांना संघात स्थान दिले आहे. फिरकीपटू म्हणून त्याने प्रसिद्ध 'कुलचा' जोडी म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या तिघांना संधी देण्यात आली आहे.

दोन महत्त्वाच्या खेळाडूंना डावललं!

महत्त्वाची बाब म्हणजे, इरफान पठाणने या संघात अनुभवी केएल राहुल आणि चांगल्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनला संधी दिलेली नाही. त्यांना संघातून वगळण्याचे धाडस इरफानने दाखवले आहे. यष्टीरक्षकाच्या पर्यायाचा विचार करता, IPL 2024 मध्ये संजू सॅमसन आणि केएल राहुल या दोघांचीही कामगिरी पंतपेक्षा प्रत्येक बाबतीत चांगली आहे. त्यामुळे त्यांनी या दोघांना वगळल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटू शकते.

इरफानने निवडलेला १५ खेळाडूंचा संघ

  • फलंदाज- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रिंकू सिंग
  • अष्टपैलू- हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा
  • फिरकीपटू- युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
  • वेगवान गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
टॅग्स :आयपीएल २०२४ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इरफान पठाणविराट कोहलीलोकेश राहुलसंजू सॅमसनरिषभ पंतरोहित शर्माहार्दिक पांड्या