Pitch Controversy, Gujarat Titans IPL 2025: आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला मला अशीच खेळपट्टी हवी, असा आग्रह धरण्याचा किंवा मागणी करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असा दावा गुजरात संघाचे सीओओ कर्नल अरविंदर सिंग यांनी केला आहे.
आयपीएलमध्ये घरच्या मैदानावरील लाभावरून वादविवाद सुरू झाला. गुजरातच्या सीओओंनी मात्र सर्व संघांसाठी खेळपट्टीची परिस्थिती कशी प्रमाणित करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'फुटबॉलमध्ये घरच्या मैदानाचा फायदा खूप महत्त्वाचा असतो. यजमानांना फिल्ड, स्टेडियमची जाणीव असते आणि स्थानिकांचा पाठिंबा मिळतो.
पंचांना प्रभावित करण्यात आणि पाहुण्यांसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करण्यात या गोष्टी मोठी भूमिका बजावतात. क्रिकेटमध्ये, विशेषतः आयपीएलमध्ये असे होत नाही. संघ मैदानाची रचना ठरवू शकत नाहीत. चाहते, स्टेडियमची परिस्थिती आणि परिमाण समजून घेणे, हे सर्व पैलू पाहुण्या संघांपेक्षा स्थानिक संघांना जास्त माहीत असणे अपेक्षित आहे. गतविजेता कोलकाता मागच्या सत्रात जेतेपदाच्या शर्यतीत घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेणारा संघ ठरला. त्यांनी चेन्नई, दिल्ली, आणि हैदराबाद यांच्याविरुद्धचे पाच सामने घरच्या मैदानावर जिंकले. बंगळुरूने घरच्या मैदानावर तीन सामने जिंकले होते.
- यंदा घरच्या मैदानावर कोणताही फायदा मिळत नसल्याचा सूर ऐकायला मिळाला. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे, लखनौचे मार्गदर्शक झहीर खान आणि चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्थानिक संघाच्या हिताची खेळपट्टी बनविली नाही, असे सांगून क्युरेटर्सवर ताशेरे ओढले.
- पंजाबचे सहायक गोलंदाजी प्रशिक्षक ट्रेवर गोन्साल्विस यांनी आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर कोणताही फायदा नसल्याबद्दल जाहीर नाराजी बोलून दाखविली.
- यावर अरविंदर म्हणाले, 3 'आयपीएलमध्ये सुरुवातीपासून स्पष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या संघाला झुकते माप मिळण्याची शक्यता नाही.
- कुणीही मला अमुक खेळपट्टीच हवी, असा आग्रह करू शकत नाही. खेळपट्टी तयार करण्याचा, तिचे स्वरूप ठरविण्याचा आणि सामन्याचे नियोजन करण्याचा अधिकार पूर्णपणे क्युरेटरचा आहे.'
Web Title: No team has the right to say that they want a pitch like this said Gujarat Titans COO Arvinder Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.