Join us

नो शेकहँड प्लीज, लंका दौऱ्यात इंग्लंडचे खेळाडू हस्तांदोलन टाळणार

‘कोरोना विषाणूच्या संक्रमनाचा धोका पाहता अगामी श्रीलंका दौ-यात इंग्लंडचे क्रिकेटपटू कोणाशीही हस्तांदोलन करणार नाहीत,’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 03:56 IST

Open in App

लंडन : ‘कोरोना विषाणूच्या संक्रमनाचा धोका पाहता अगामी श्रीलंका दौ-यात इंग्लंडचे क्रिकेटपटू कोणाशीही हस्तांदोलन करणार नाहीत,’ अशी माहिती इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने दिली. इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामन्यासाठी श्रीलंका दौºयावर जाणार आहे. रुट म्हणाला की, ‘या दौºयावर अभिवादन करताना हस्तांदोलन करण्यापेक्षा अन्य मार्ग वापरला जाणार आहे.’दक्षिण आफ्रिका दौºयावेळी इंग्लंडच्या अनेक खेळाडूंना पोटाचे विकार व ताप झाला होता. रुट म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेत आजारी पडल्यामुळे आम्हाला कमीत कमी संपर्काचे महत्त्व कळाले आहे. आमच्या वैद्यकिय टीमने आम्हाला जिवाणूंचा प्रसार व रोग प्रसार रोखण्यासाठी व्यवहारिक सल्ला दिला आहे.’या दौºयामध्ये हस्तांदोलन करण्याऐवजी दोन्ही संघाचे खेळाडू हाताची मुठ एकमेकांना टेकवून अभिवादन करतील, अशी माहितीही रुटकडून मिळाली. त्याचप्रमाणे नियमितपणे इंग्लंडचे खेळाडू हात स्वच्छ करणार असल्याचेही रुटने सांगितले. (वृत्तसंस्था)