Brian Lara Picks 4 Greatest of All Time and Legend's of Cricket With Jasprit Bumrah : वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज क्रिकेटर आणि आणि माजी कर्णधार ब्रायन लारा याने क्रिकेट जगतातील ४ सर्वकालीन महान (GOATS) खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्याच्या सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत फक्त एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेस्ट इंडिजचा संघ २७ धावांवर ऑल झाल्यावर त्याचा दोष भारतीय क्रिकेटमधील आयपीएल स्पर्धेला दिल्यावर आता लारानं हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना खटकणारी गोष्ट बोलून दाखवलीये. कारण त्याने सर्वकालीन खेळाडूंच्या यादीत या दोघांपैकी एकालाही स्थान त्यानं दिलेले नाही.
लाराच्या सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत कोण?
'स्टिक टू क्रिकेट' पॉडकास्ट कार्यक्रमात ब्रायन लारानं आपल्या सर्वकालिन महान खेळाडूंची यादीत कोण कोण आहे ते सांगितले. त्याच्या चार खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, ऑस्ट्रेलियन माजी जलगदती गोलंदाज ग्लेन मॅग्रा, दक्षिण आफ्रिकाचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर अॅडम गिलख्रिस्ट याचा समावेश आहे.
वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष
बुमराहनं सोडलीय खास छाप
सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत २०६ सान्यात २०.४७ च्या सरासरीसह ४५५ विकेट्स घेतल्या आहेत. १९ धावांत ६ विकेट्स ही बुमराहची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १७ वेळा पाच विकेट्सचा डाव साधला आहे. कसोटीत त्याची कामगिरी अधिक खास राहिलीये.
अन्य तीन सर्वकालिन महान खेळाडूंची कामगिरी
ऑस्ट्रेलियन मॅग्रा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ९४९ विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कॅलिसनं आपल्या कारकिर्दीत १० हजार धावांसह ५०० विकेट्स घेत खास छाप सोडली आहे. गिलख्रिस्टनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२९ सामन्यात १५ हजारपेक्षा अधिक धावा केल्या असून विकेटमागे त्याने ९०५ फलंदाजांची शिकार केली आहे.
लारानं दिग्गजांच्या यादीत रोहितसह या मंडळींना दिलंय स्थान
ब्रायन लारा याने रोहित शर्मासह आपला माजी सहकारी ख्रिस गेल, पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, इंग्लंडचा केविन पीटरसन आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांना दिग्गज खेळाडू असा उल्लेख केला आहे.