पाकिस्तानमध्ये दम नाही! भारतीय दिग्गजाने वर्ल्ड कप स्पर्धेचे ४ सेमी-फायनलिस्ट केले जाहीर

ICC World Cup 2023 - भारतात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या दावेदारांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 04:48 PM2023-09-20T16:48:33+5:302023-09-20T16:49:56+5:30

whatsapp join usJoin us
No Place For Pakistan! Former India spinner Harbhajan Singh has picked four favourites for the upcoming ICC World Cup 2023 | पाकिस्तानमध्ये दम नाही! भारतीय दिग्गजाने वर्ल्ड कप स्पर्धेचे ४ सेमी-फायनलिस्ट केले जाहीर

पाकिस्तानमध्ये दम नाही! भारतीय दिग्गजाने वर्ल्ड कप स्पर्धेचे ४ सेमी-फायनलिस्ट केले जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 - भारतात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या दावेदारांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्यात पाकिस्तान हे एक नाव कॉमन होते, परंतु आशिया चषक स्पर्धेतील कामगिरी पाहिल्यानंतर पाकिस्तानला हे जमणार नाही, असाच सूर उमटू लागला आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातीत १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबरला उद्धाटनीय लढत होणार आहे. ८ ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरूवात करणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने वर्ल्ड कप स्पर्धेतील चार सेमी फायनलिस्ट जाहीर केले आहेत. त्यानेही पाकिस्तानला या लिस्टमधून वगळले आहे.
अहमदाबाद, कोलकाता, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, लखनौ आणि पुणे येथे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. ४५ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि १९ नोव्हेंबरला आपल्याला वर्ल्ड कप विजेता मिळणार आहे. हरभजन सिंगने भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील असा दावा केला आहे. वन डे क्रमवारीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी असला तरी भज्जीने त्यांना त्याच्या फेव्हरिट ४ मध्ये स्थान दिलेले नाही आणि त्यामागचं कारणही त्यानं समजावून सांगितले आहे.


भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेबाबत त्याने आधी सांगितले की, ''भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली स्पर्धा तगडी आहे आणि तशी आशा करायला हरकत नाही. या मालिकेत जो जिंकेल तो वर्ल्ड कप स्पर्धेचा एक प्रबळ दावेदार असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतील ऑस्ट्रेलियाही एक दावेदार आहे आणि टीम इंडियाही आहे. इंग्लंडही या शर्यतीत आहे.'' 


''उपांत्य़ फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ न्यूझीलंड असेल. सर्वजण पाकिस्तानच्या संघावर नजरा खिळवून बसले आहेत, त्यांना वाटतंय की ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान चांगला संघ आहे. पण, मला असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या मला एवढा दम वाटत नाही. ट्वेंटी-२०मध्ये ते ठिकठाक खेळतात,''असेही भज्जी म्हणाला.  


इंग्लंड हे गतविजेते आहेत, तर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताला मागील १० वर्षांत आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु घरच्या मैदानावर ते हा दुष्काळ संपवतील अशी आशा आहे. अनेक जणांच्या फेव्हरिट लिस्टमध्ये न्यूझीलंडचे नाव नसले तरी सातत्य हिच त्यांची खरी ताकद आहे. २०१९मध्ये ते फायनलमध्ये आले होते, २०१६ मध्ये ते उपांत्य फेरीपर्यंत आले होते.  
 

Web Title: No Place For Pakistan! Former India spinner Harbhajan Singh has picked four favourites for the upcoming ICC World Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.